शासकीय तंत्रनिकेतनातील 1988–91 च्या बॅचमधून जुळलेली मैत्री ही केवळ काळ बदलला, प्रत्येकाची वाट वेगळी झाली, पण मैत्रीचा धागा आजही तितकाच मजबूत आहे.
हे संकेतस्थळ आपल्या सर्व मित्रांना एकाच व्यासपीठावर जोडण्यासाठी तयार करण्यात आले आहे. येथे स्नेहसंमेलनांची माहिती, विविध उपक्रम, सामाजिक कार्य, फोटो गॅलरी, महत्त्वाच्या सूचना, सदस्यांची माहिती आणि आपल्या अविस्मरणीय आठवणींचा खजिना जतन केला जाईल.
आपला GPP मित्रपरिवार हा केवळ गेट-टुगेदरपुरता मर्यादित नाही. गरजेच्या वेळी एकमेकांच्या पाठीशी उभे राहणे, सामाजिक बांधिलकी जपणे आणि पुढील पिढीसाठी प्रेरणादायी कार्य करणे, हीच आपल्या परिवाराची खरी ओळख आहे.
चला, मैत्रीचे हे नाते अधिक दृढ करूया, जुन्या आठवणींना उजाळा देऊया आणि नव्या आठवणींची सुंदर भर घालूया.
"मैत्रीचा प्रवास अखंड राहो... आणि GPP परिवार सदैव एकदिलाने जोडलेला राहो!"